प्लास्टिक प्रदूषण एक समस्या

जसजसा तंत्रज्ञानाचा विकास होत गेला तसतसे माणसाच्या जीवनमानात बदल होत गेले. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे माणूस साधिसुधि जीवनशैली विसरून मॉडर्न लाईफ-स्टाईल अंगीकारु लागला. जुन्या काळातील लोक आपल्या दैनंदिन व्यवहारात पर्यावरणपूरक वस्तू वापरत असत. त्यामुळे पर्यावरणास कोणतीही हानी होत नसे.

 

परंतु, आता तसे नाही आहे, आज माणसाच्या दैनंदिन व्यवहारातील कितीतरी वस्तू या टेकनॉलॉजिच्या साहाय्याने बनवल्या जात आहेत. यामुळे बरेचसे घरगुती उद्योग बंद पडत चालले आहेत. आणि दुसरे एक म्हणजे कंपनी मालक अधिक नफा मिळवण्याच्या उद्दिष्टाने या वस्तू बनवताना घातक रसायने मिसळतात. आणि या वस्तू पर्यावरण पूरकदेखील नसतात. अर्थात आपण या वस्तू वापरून झाल्यानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावल्यास प्रदूषणासारखी गंभीर परिस्थिती टळू शकते.

 

पण, तसे होत नाही. आपण या वस्तू वापरून झाल्यानंतर इतरत्र फेकल्याने विविध प्रकारच्या प्रदूषनांना आमंत्रण मिळते. त्यामध्ये मृदा (soil), हवा (air) आदी. परंतु, मृदा, हवा आदी प्रदुषित होण्यासाठी “प्लास्टिक(plastic) ” कारणीभूत ठरते. तर आज आपण या लेखामध्ये याच प्लास्टिक प्रदुषणाविषयीं माहिती घेणार आहोत.

Plastic Pollution

प्लास्टिक प्रदूषण म्हणजे काय? | What is plastic pollution?

जमिनीत किंवा पाण्यात प्लास्टिकच्या वस्तू जमा होण्याला प्लास्टिक प्रदूषण म्हणतात, ज्याचा वन्य प्राण्यांच्या किंवा मानवांच्या जीवनावर वाईट परिणाम होतो. Plastic प्रदूषण वन्यजीव, पर्यावरणातील वन्यजीवांच्या अधिवासावर विपरित परिणाम करते. प्लास्टिक प्रदूषणामुळे जमीन, जलमार्ग आणि महासागर देखील प्रदूषित होतात.

 

 

प्लास्टिक प्रदूषणाच्या निर्मितिची कारणे

प्लास्टिक प्रदूषणामुळे आपल्या पर्यावरणाला खूप वेगाने हानी पोहोचत आहे. प्लास्टिक साहित्यापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे खूप अवघड होऊन जाते आणि ते पृथ्वीवरील प्रदूषणामध्ये देखील महत्त्वपूर्ण योगदान देते. ज्यामुळे प्लास्टिक प्रदूषण हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. प्लास्टिक पिशव्या, भांडी आणि फर्निचरच्या वाढत्या वापरामुळे प्लास्टिक कचऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे प्लास्टिक प्रदूषणासारखी गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

See also  मराठी भाषा माहिती | Marathi Language

 

 

प्लास्टिक प्रदुषणाचा मानव आणि प्राण्यांना धोका

सागरी प्राण्यांप्रमाणेच कचऱ्यामध्ये विखुरलेले प्लास्टिक भूतलावरील प्राणी अन्न म्हणून खातात. बऱ्याच वेळा हे प्राणी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक खातात जे त्यांच्या आतड्यांमध्ये अडकते व त्यांचा मृत्यू होतो. प्लॅस्टिक कचरा कालांतराने खराब होतो, ज्यामुळे डास, माशी आणि इतर कीटकांचे प्रजनन होण्यासाठी ते चांगले निवासस्थान बनते, ज्यामुळे विविध प्रकारचे रोग होतात.

 

Plastic कचऱ्यामुळे नद्या, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत देखील दूषित होतात. प्लास्टिक प्रदूषणामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत चालली आहे, आणि असे पाणी प्यायल्याने अनेक आजार उद्भवतात.

 

 

प्लास्टिक प्रदूषण कमी कसे होईल?

Plastic कचऱ्याची विल्हेवाट लावणे हे साऱ्या जगासमोर एक आव्हानात्मक काम आहे. जेव्हा प्लास्टिक कचरा मृदा (soil) किंवा पाण्याच्या स्त्रोतांपर्यंत (water sources) पोहोचतो, तेव्हा ती एक गंभीर समस्या बनते. लाकूड आणि कागदाप्रमाणे आपण ते जाळून नष्ट करू शकत नाही. कारण प्लास्टिक जाळल्यामूळे त्यातून अनेक हानिकारक वायू तयार होतात, जे पृथ्वीच्या वातावरणासाठी आणि जीवनासाठी अत्यंत हानिकारक असतात. यामुळे, प्लास्टिक हवा, पाणी आणि जमीन या तीनही प्रकारचे प्रदूषण होते.

 

आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण प्लास्टिक उत्पादनांचा वापर पूर्णपणे थांबवू शकत नाही. पण, त्याचा वापर नक्कीच कमी करू शकतो. प्लास्टिकपासून बनवलेल्या अनेक वस्तू जसे की प्लास्टिक पिशव्या, डबे, चष्मा, बाटल्या इत्यादींच्या जागी, आपण इतर पर्यावरणपूरक उत्पादने जसे की कपडे, कागदी पिशव्या, स्टीलची बनलेली भांडी आणि इतर गोष्टी वापरू शकतो.

 

प्लास्टिक प्रदूषण नियंत्रित करणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही आणि प्रत्यक्षात एकटे सरकार या संदर्भात काहीही करू शकत नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी आपण वैयक्तीक पातळीवर प्रयत्न केले तरच या समस्येवर आपण मात करू शकतो.

 

निष्कर्ष

गेल्या काही दशकांत प्लास्टिक प्रदूषणाची पातळी खूप वेगाने वाढली आहे, जी चिंतेची बाब आहे. आपल्याकडून प्लास्टिकचा वाढता वापर थांबवूनच या भयानक समस्येवर मात करता येईल. आपल्यापैकी प्रत्येकाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुढे आले पाहिजे. आणि ते थांबवण्यासाठी आपण आपले अमूल्य योगदान दिले पाहिजे.

See also  भारतातील टॉप व्यक्तिमत्त्वे

 

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न | FAQ

प्रश्न : प्रदूषणाचे प्रकार किती आहेत?

उत्तर : 4

प्रश्न : प्रदूषणाचे प्रकार कोणकोणते आहेत? | Types of pollution?

उत्तर : जल प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, मृदा प्रदूषण

 

 

हे पण वाचा…..

5 thoughts on “प्लास्टिक प्रदूषण एक समस्या”

  1. Hey There. I found your blog using msn. This is an extremely well written article. I’ll be sure to bookmark it and come back to read more of your useful information. Thanks for the post. I will certainly return.|

    Reply

Leave a Comment